बातम्या

(ता. कर्जत, जि. रायगड) महाराष्ट्राला डोंगरी किल्ल्याचं भरभरून वरदान दिलेल आहे. किल्ले म्हणजे फक्त काय दगड, माती, कातळ, वनराई, उंच शिखर, बिकट वाट, खाचखळगे नव्हे....

दिन विशेष

महाराष्ट्र दिन : महाराष्ट्र.
गुजरात दिन : गुजरात.
कामगार दिन : अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर.
लेइ दिन : हवाई.
बेल्टेन : आयर्लंड.
राष्ट्रीय प्रेम दिन : चेक प्रजासत्ताक.
कायदा दिन : अमेरिकेची संयुक्त संस्थाने.

ठळक घटना

१८६२ : मुंबई विद्यापिठाचा पहिला पदवीदान समारंभ.
१८८६ : या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.
१८९७ : स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना
१९३० : सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
१९५६ – पोलियोची लस जनतेस उपलब्ध.
१९६० : द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
१९८१ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती
१९७२ : कोळसा खाणीचे राष्ट्रीतीकरण करण्यात आले.
१७३९ : चिमाजीअप्पांनी सैन्यासह वसईवर हल्ला केला.